Pune crime News : मारणे टोळीतील दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – बोपदेव घाटात बाथरूमसाठी थांबलेला कारचालक व त्याच्या साथिदार यांच्यावर दरोडा टाकून फरार झालेल्या मारणे टोळीतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. 2019 पासून दोन वर्षे हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. गुन्हे शाखेच्या युनिट एकने अखेर त्यांना ताब्यात घेतले आहे.

अभिषेक ऊर्फ नन्या उदय मारणे (वय 21, रा. माळेगाव, ता. मुळशी) व अक्षय अशोक सावले (वय 23, रा. खामबोली, ता मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमद कुरेशी हे 29 ऑगस्ट 2019 रोजी त्यांच्या मित्रासोबत बोपदेव घाटात बाथरुमसाठी गाडी बाजूला उभी करून थांबले होते. त्यावेळी 5 ते 6 अनोळखी इसमांनी कुरेशी व त्यांच्या सोबत असलेल्या मित्राला शिवीगाळ करुन त्यांच्या हातातील दोन सोन्याचा अंगठया व गळयातील सोन्याची चेन काढून घेतली. तसेच, त्यांना मारहाण करून जखमी केले. याबाबत कुरेशी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा नोंद झाल्यानंतर संकेत मारणे व इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली, मात्र, अभिषेक मारणे, अजय जाधव व एक अनोळखी इसम 2019 पासून पोलीसांना गुगांरा देत होते. दरम्यान, पोलिसांना आरोपी अभिषेक ऊर्फ नन्या मारणे हा घोटावडे फाटा, मुळशी येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.