Pune crime News : खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील तीन वर्षापासून फरार आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज – खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट सहाला यश आले आहे. हा आरोपी सतत राहण्याची ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी हडपसर परिसरात शनिवारी (दि.31) त्याच्या मुसक्या आवळल्या.

बिनोय गौतम कर्मकोर (वय 22, रा. काळे पडळ, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी वारंवार राहण्याची ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, तो आपल्या घरी येणार असून पळून जाण्याच्या बेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या राहत्या घराच्या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.