Pune : राष्ट्रवादी काँग्रेसने घातले सत्ताधारी भाजपचे श्राद्ध !

एमपीसी – पुणे महापालिकेत नवीन 11 गावे समाविष्ट होऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले मात्र हे गाव अजून देखील विकासापासून वंचित आहेत. याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून या वर्षपूर्ती निमित्त सत्ताधारी भाजपचे श्राद्ध घालून आपलं निषेध व्यक्त केला. 

राज्यसरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार बळजबरीने या गावांचा महापालिकेत समावेश केला. आता विकास करताना ते सरळ दिसत असून पालकमंत्र्यांना देखील या गावांचा विसर पडलाय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली.

दरम्यान, या गावांत अनेक अडचणी आहेत त्यांचा साधा कचरा सुद्धा उचलला जात नाही.त्यांचं गावपण हरवलं आणि पुणेकर म्हणून स्वीकारत सुद्धा नाही त्यामुळे लवकरात लवकर या गावांमध्ये विकास कामांना सुरवात करावी अन्यथा भाजपच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना या गावात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलकांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.