Pune News : पुणे जिल्ह्यातील 3.41 लाख रुग्ण झाले बरे, रिकव्हरी रेट 94.24 टक्के

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 41 हजार 540 एवढी झाली आहे. 3 लाख 21 हजार 855 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात सध्या 11 हजार 397 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्हयात 8 हजार 288 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.24 टक्के आहे.

विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 लाख 33 हजार 782 झाली आहे. विभागातील 5 लाख 03 हजार 386 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात 15 हजार 432 सक्रिय रुग्ण आहेत. विभागात 14 हजार 964 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के इतके आहे तर, बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.31 टक्के आहे.

कालच्या बाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत आज विभागात बाधित रुग्णाच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 460 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 1080, सातारा जिल्ह्यात 169, सोलापूर जिल्ह्यात 171, सांगली जिल्ह्यात 21, कोल्हापूर जिल्ह्यात 19 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.

विभागात शनिवारी (दि.28) बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 164 आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 763, सातारा जिल्ह्यामध्ये 120, सोलापूर जिल्ह्यामध्ये 211, सांगली जिल्ह्यामध्ये 35 व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 35 अशा रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकुण 28 लाख 38 हजार 538 नमून्यांची तपासणी करण्यात आली असून, 5 लाख 33 हजार 782 नमून्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.