Pune News : पुणे शहरात नवे 40 कंटेन्मेंट झोन

एमपीसी न्यूज – महापालिकेकडून शहरात 40 सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र घोषित केले आहेत. यामध्ये सर्वाधिक कंटेन्मेंट झोन औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत.

शहरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कंटेन्मेंट झोन तयार केले जात आहेत. याठिकाणी काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याठिकाणी फलक आणि आवश्यकतेनुसार बॅरिकेटस लावण्यात येत आहे.

क्षेत्रीय कार्यालय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र

औंध-बाणेर 10
कोंढवा-येवलेवाडी 09
ढोले पाटील 06
कोथरुड बावधन 05
वानवडी 03
बिबवेवाडी 03
धनकवडी-सहकारनगर 03
सिंहगड रस्ता 01

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.