Chakan Crime News : वारसाने मिळणाऱ्या जमिनीत हिस्सा मागितल्यास जीवे मारण्याची धमकी 

वृद्धाकडे मागितली 50 हजारांची खंडणी

एमपीसी न्यूज – वारसाने मिळणाऱ्या जमिनीत हिस्सा मागितल्यास वृद्ध नागरिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच वृद्धाकडे 50 हजारांची खंडणी मागितली. हा प्रकार 27 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत चाकण येथे घडला.

मारुती दामोदर जाधव (वय 73, रा. पुणे) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुळशीराम जाधव, निलेश तुळशीराम जाधव, शिवाजी तुळशीराम जाधव (सर्व रा. आगरकरवाडी, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या शेतात येण्यास आरोपींनी प्रतिबंध केला. मंदिरासाठी केलेले बांधकाम दगडाने पाडून त्याचे नुकसान केले. फिर्यादी यांना त्यांच्या वारसाहक्काने मिळणाऱ्या जमिनीत, घरात हिस्सा मागितल्यास फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच 50 हजारांची खंडणी मागितली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.