Pune News : कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या 47 हॉटेलवर कारवाई

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या हॉटेल व इतर आस्थापनांवर पुणे महापालिकेने कठोर कारवाई सुरू केली आहे. गेल्या 5 दिवसांत नियम न पाळणाऱ्या 47 हॉटेल्सवर कारवाई करत दंड आकारणी करण्यात आली आहे.

कारवाई झालेल्या हॉटेलमध्ये फर्ग्यूसन कॉलेज वरील गुडलक कॅफे, वैशाली आणि रुपाली हॉटेलचा समावेश आहे. एकूण 47 हॉटेलवर गेल्या 5 दिवसात ही कारवाई केली आहे. प्रत्येकी 5 हजार रुपये दंड करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्स, सॅनीटायझर आणि मास्क न घालणे यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, असे सहाय्यक आरोग्य अधिकारी मनीषा नाईक यांनी सांगितले.

शहरात कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस प्रशासनाकडून नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण अनेक ठिकाणी याचे पालन होताना दिसत नाही. आता अशा ठिकाणी पालिका कारवाई करत आहे. त्यानुसार गेल्या 5 दिवसात शहरातील 47 हॉटेल कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत, पालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी मनीषा नाईक म्हणाल्या, यापुढे देखील शहरात ही कारवाई सुरू राहणार आहे. हॉटेल व्यवसायिक तसेच इतर आस्थापना यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमाचे पालन करावे. दिलेल्या सूचना पाळाव्या तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.