Pune News : रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब औषधांचा पुरेसा साठा : जिल्‍हाधिकारी

एमपीसी न्यूज – राज्यासह पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांचा साठा मर्यादित असला तरी तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

ज्या औषध वितरकांकडे ही औषधे उपलब्ध आहेत, त्यांची यादी जाहीर करण्यात येत आहे. औषध वितरणात होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्‍याचा इशाराही जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिला आहे.

या औषधांच्या गैरप्रकाराबाबत काही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365  वर देण्यात यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्‍त सुरेश पाटील यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.