Pune : पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट
एमपीसी न्यूज- पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या (Pune) नावानेच बनावट फेसबुक अकाऊंट उघडल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी डॉ. राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसांमध्ये याबाबतची तक्रार दिली आहे.
सायबर चोरट्यांनी ‘माही वर्मा’ या नावाने हे बनावट अकाऊंट तयार केलं होतं. या अकाऊंटवरून जिल्हाधिकारी देशमुख यांचे फोटो देखील पोस्ट करण्यात आले होते. तसेच देशमुख यांच्या मूळ अकाऊंटवरील काहींना रिक्वेस्टही पाठवण्यात आल्या होत्या. सायबर चोरट्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट बनवल्यामुळे खळबळ उडाली आहे.
Pimpri : घरेलू कामगारांना मिळाले दहा हजार रुपये
डॉ.राजेश देशमुख यांचे नाव वापरून याआधीही दोन वेळा अज्ञातांनी फेसबुकअकाऊंट तयार केलं होतं. त्यामुळे अशा कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन डॉ.राजेश देशमुख यांनी (Pune) नागरिकांनी केले आहे.