Hinjawadi : परदेशातील नोकरीच्या आमिषाने तरुणाची सहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने (Hinjawadi) तरुण व त्याच्या मित्राची तब्बल सहा लाखांची फसवणूक कऱण्यात आली आहे. हा प्रकार 1 जानेवारी 2023 ते 27 एप्रिल या कालावधीत हिंजवडी येथे घडली आहे.

 

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.30) कार्तिक मोहपत चामट (वय 29) यांनी फिर्याद दिली असून मुकेश कुमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र सुशांत जाधव यांना आरोपीने कॅनडा येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी साडे सहा लाख रुपये घेतले मात्र अद्याप नोकरी लावली नाही. यावरून फिर्यादी यांनी आरोपीला प्रोसेसींग फिस कॅन्सल करण्यास सांगितले असता 50 हजार रुपये दिले. मात्र अद्याप फिर्यादीचे दोन लाख व त्यांच्या मित्राचे 4 लाख असे एकूण 6 लाख रुपये परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. यावरून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत (Hinjawadi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.