Pune News : संविधान अवमानप्रकरणी प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

एमपीसी न्यूज – अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आपल्या घरी बसवलेल्या गणपतीच्या पाटाखाली भारतीय संविधानाची प्रत ठेवून संविधानाचा अवमान केला आहे. मनुवादी मानसिकतेतून प्रवीण तरडे यांनी केलेला हा प्रकार आहे. त्यामुळे याप्रकरणी प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करावी व अशा प्रकारची कृती करण्यामागील मास्टरमाईंड शोधून काढावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती व इतर संघटनांनी केली.

भारती विद्यापीठ पोलीस चौकीसमोर निषेध आंदोलन करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवीण तरडे यांना माफी मागण्याची तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

रिपब्लिकन संघर्ष सेना, बहुजन समाज संघ, भारतीय मायनोरिटीज सुरक्षा महासंघ आदी संघटनांनी हे आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष महिला विजयाताई बेंगळे, डिंपल सोनवणे, आशा गायकवाड, सरोज वाल्मीकी, पूजा ताई, सुनील म्हस्के, बबन जवंजाळ, योगेश वरपे, शिवा पाटोळे, आदेश सोनवणे, कार्तिक लोणारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.