Pune News : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा आज मेळावा

एमपीसी न्यूज – विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी (Pune News) विद्यार्थी-विद्यार्थिनींचा 34 वा स्नेहमेळावा उद्या रविवारी (दि. 26 फेब्रुवारी 2023) आयोजिला आहे. माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने रविवारी सकाळी 9 ते दुपारी 4  या वेळेत शिवाजी हौसिंग सोसायटी येथील समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवन वसतिगृहात हा मेळावा होत असून, यंदा मेळाव्याचे प्रायोजकत्व कोकण आणि मुंबई विभागातील माजी विद्यार्थ्यांकडे आहे, अशी माहिती माजी विद्यार्थी मंडळाचे कार्यवाह सुनील चोरे व मेळावा समन्वयक संजीव पाध्ये यांनी दिली.

 

ज्येष्ठ माजी विद्यार्थी प्रसाद रायकर हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी, तर अमोल शहाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष राजू इंगळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Pune News : नौकानयन राष्ट्रीय स्पर्धेत लष्कराच्या दत्तू भोकनळची चमकदार कामगिरी

मेळाव्यात ज्येष्ठ कार्यकर्ता, देणगीदार व कर्मचारी यांचा सन्मान, विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान, कार्यपरिचय यासह गप्पा-गोष्टी, विचार विनिमय व जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. अधिकाधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मेळाव्यात सहभागी होण्याचे, तसेच अधिक माहितीसाठी संजीव पाध्ये (9763339810), गणेश काळे (9822778326), मनीषा गोसावी ( 9923462449), गणेश ननावरे (8380851730) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या गरीब व हुशार विद्यार्थ्यांची अल्पदरात भोजन व निवासाची सोय व्हावी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, या उद्देशाने गेली 68 वर्षे विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे ही संस्था काम करते. येथून बाहेर पडलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पुन्हा संस्थेत योगदान द्यावे, संस्थेशी संलग्नित राहून आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, या निमित्ताने असे मेळावे उपयुक्त ठरतात, असे मंडळाच्या (Pune News) वतीने नमूद करण्यात आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.