Alandi News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक पार

एमपीसी न्यूज – आळंदी येथील विठ्ठल कृपा मंगल कार्यालयामध्ये (Alandi News) आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक खेड तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली खाली पार पडली.यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्या मध्ये राष्ट्रवादी ने केलेली विकास कामे याची उपस्थितांना माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादी नेते डी डी भोसले , प्रकाश कुऱ्हाडे आदी मान्यवरांनी आपली मनोगतें व्यक्त केली.

Pune News : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा आज मेळावा

 

राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत अनेक पदांची नियुक्ती होणार असून यावेळी त्याकरिता  इच्छुकांनी नाव नोंदणी केली. यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रवादी खेड तालुका युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर,राष्ट्रवादी खेड (Alandi News) तालुका विद्यार्थी अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांची उपस्थिती लाभली.

तसेच राष्ट्रवादी चे पदाधिकारी बबनराव कुऱ्हाडे,विजय बिडकर ,श्रीधर कुऱ्हाडे, रोहन कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे,आरिफ शेख,निसार सय्यद,अमित कुऱ्हाडे इ.मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.