Wakad News : ‘मी या एरियाचा भाई आहे’ म्हणत गुंडाच्या टोळीचा राडा

एमपीसी न्यूज  – मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणत सराईत (Wakad News) गुंडासह त्याच्या टोळीने राडा घातला. एकाला बेदम मारहाण करत त्याच्याकडील ऐवज लुटला. याप्रकरणी पाच जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल आला आहे. हा प्रकार वाकड येथे घडला.

सराईत गुन्हेगार शाहरुख खान (वय 25), बाळा लोखंडे (वय 25, दोघे रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. आनंद वाल्मिकी (वय 27), जुबेर खान (वय 20), विष्णू कांबळे (वय 21, सर्व रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

 

Alandi News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक पार

 

सागर अरुण कदम (वय 17, रा. जगतापनगर, थेरगाव) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शाहरुख खान हा रेकॉर्डवरील गुंड आहे. फिर्यादी सागर व त्याचे मित्र हे काळखडक येथे हॉटेलात असताना आरोपी बाळा फिर्यादीजवळ गेला. तू आमच्या भाईकडे का बघितले, असे म्हणाला.

त्यानंतर बाळा व शाहरुख यांनी सागरला हॉटेल बाहेर ओढत नेले. शाहरुखने मी कोण आहे तुला माहित आहे का, असे म्हणत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी ( Wakad News ) सागरने आरडाओरडा केला असता दहशतीने परिसरातील लोक व सागरचे मित्र तेथून सैरावैरा पळून गेले. त्यावेळी इतर आरोपींनीही सागरला मारायला सुरुवात केली. शाहरुखने सागरच्या तोंडावर मारून त्याच्या खिशातील तीन हजारांची रोकड काढून घेतली.

मी या एरियाचा भाई आहे, शाहरुख भाई आहे, अख्खे पिंपरी-चिंचवड मला घाबरतय, आणि तू मला नडतो काय, तुला आता सोडत नाही, अशी शाहरुखने धमकी दिली. त्यानंतर कोयता हातात घेऊन थांब आता तुला सोडत नाही, तुला खल्लासच करतो, अशी धमकी दिली. हे पाहून परिसरातील दुकानदारांनी ( Wakad News ) दहशतीने दुकाने बंद केली. फौजदार नाईक-निंबाळकर तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.