Pune News: स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

एमपीसी न्यूज: पुणे महापालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम असलेल्या स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी २ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहकार्य केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले. या चॅलेंजसाठी याआधी २४ डिसेंबरपर्यत मुदत देण्यात आली होती, मात्र अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी या स्पर्धेत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

हे स्टार्टअप चॅलेंज समाज सहभाग (सोशल इन्कलूजन), शून्य कचरा व्यवस्थापन (झिरो डंप), प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन (प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट) आणि पारदर्शकता (ट्रान्स्फरन्सी) या चार मुख्य संकल्पनांवर आधारित असून ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
इच्छुकांनी आपली नवकल्पना ५ ते ६ स्लाईड मध्ये आणि ५ मिनिटांच्या व्हिडीओ मधून मांडणे आवश्यक आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर मिळेल.

पुढील लिंकवर अर्ज करावेत
https://forms.gle/8umeAZXdRsCBzRvz5

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.