Pune News : श्रीराम चरित्राचा अपमान करणार्‍यांना अटक करा, हिंदू संघटनेतर्फे पुण्यात आंदोलन

एमपीसी न्यूज – कर्नाटकातील वादग्रस्त प्राध्यापक के. एस्. भगवान यांनी, ‘भगवान श्रीराम पत्नी सीतासोबत दिवसभर दारू पीत होते. राम हा आदर्श राजा नाही’ अशी आक्षेपार्ह विधान केले. त्या विरोधात जामिन रद्द करून त्यांना तात्काळ अटक कारावे (Pune News) अशी मागणी करत मंगळवारी (दि.24) कर्वेरोड येथील दशभूजा गणपती मंदिरासमोर हिंदू संघटना तर्फे आंदोलन करण्यात आले.

यावेळी डहाणूकर कॉलनीतील राम मंदिराचे श्री श्याम देशपांडे , हिंदू जनजागृती समितीचे श्री पराग गोखले प्रा. विठ्ठल जाधव तसेच हिंदू जनजागृती समिती व हिंदू संघटनाचे 70 हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.  या वेळी ‘जो नहीं हमारे राम का, नहीं किसी के काम का‘, ‘प्रभू श्रीराम का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्थान’ आदी घोषणा देण्यात आल्या.

 

Pune Crime News : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

यावेळी ‘पुन्हा अशी आक्षेपार्ह विधाने करणार नाही’, या अटीवर त्यांना जामीन मिळाला होता. या अटीचा भंग केल्याने त्यांचा जामीन रद्द करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी सरकारकडे आम्ही आंदोलनाद्वारे करण्यात आली.

 याचप्रकारे बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांनी संत तुलसीदास विरचित ‘श्रीरामचरितमानस’ला ‘नफरत फैलानेवाला’ ग्रंथ म्हटले, तर उत्तर प्रदेशचे (Pune News) समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’मधील दोह्यांवर बंदीची मागणी करत हे ग्रंथ जप्त करून नष्ट करायला हवेत, अशी संतापजनक वक्तव्ये केली आहेत.

त्यामुळे या दोघांवर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.