Pune News : विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघ काढणार मोर्चा

एमपीसी न्यूज – मजदूर संघटना विविध (Pune News) मागण्यांसाठी मुंबई व नागपूर येथे मोर्चा काढणार आहे. त्यासाठी भारतीय मजदूर संघटनेच्य़ा पुणे जिल्हा कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत ठराव मांडण्यात आला.

यावेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण, कार्याध्यक्ष ऊमेश विस्वाद, वेळी औद्योगिक, संरक्षण, बॅंक, बांधकाम कामगार, घरेलु कामगार, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री सचिन मेंगाळे वीज ऊद्योगातील कायम व कंत्राटी कामगारांच्या संघटनेचे पदाधिकारी, बैठकीत सहभागी झाले होते.

MPC News Podcast 9 December 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन दराच्या पाच वर्षानंतर त्वरीत नवीन वेतन दर कामगारांना लागू केले पाहिजेत, असे असतानाही महाराष्ट्र राज्यातील सुमारे 40 अनुसूचित रोजगार मध्ये असलेल्या कामगारांना मागील 8/9 वर्षापासून प्रलंबित होते. याबाबतीत भारतीय मजदूर संघाच्या वतीने वारंवार (Pune News) पाठपुरावा करून, आंदोलन करून कामगारांना महागाईप्रमाणे वेतन देण्यात यावे, अशी मागणी केली होती. तरीही कोणताच बदल होत नसल्याने 21 डिसेंबर 2022 मुंबई व 28 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे व मोर्चा मधील महत्वपूर्ण मागणी केली आहे.

 

भारतीय मजदूर संघ संघाचे उर्वरित प्रलंबित किमान वेतन त्वरित लागू करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यामुळे रोजगारातील कायम तसेच लाखो कंत्राटी कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.