Pune News : पुणे-सोलापूर महामार्गावर बस व ट्रकचा अपघात , दोघांचा जागीच मृत्यू 15 जखमी

एमपीसी न्यूज-पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड गावाच्या हद्दीत पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बस आणि ट्रकचा भीषण अपघात (Pune News)  झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. भरधाव वेगात जाणारी बस उभ्या ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला.

 

MPC News Podcast 1 February 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड जवळ हा अपघात झाला. अपघात ग्रस्त खासगी बस ही सोलापूर हून पुण्याच्या दिशेने जात होती. बस मध्ये एकूण 35 प्रवासी होते. दरम्यान भरधाव वेगात असणारी बस रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी नागरिकांना घटनास्थळी जमलेल्या (Pune News) लोकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.