Pune News : केअर टेकर महिलेनेच पळविले नऊ लाखाचे सोन्याचे दागिने

एमपीसी न्यूज – घरात कामासाठी असलेल्या केअर टेकर महिलेनेच नऊ लाखाचे सोन्याचे दागिने पळविले असल्याची घटना समोर आली आहे. कृष्णा निवास, एरंडवणा येथे 4 ते 10 नोव्हेंबर 2021 या कालावधीत ही घटना घडली.

याप्रकरणी 62 वर्षीय एका जेष्ठ महिलेने याप्रकरणी शनिवारी (दि.20) डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार घरकाम करण्या-या महिले विरोधात भारतीय दंड विधान कलम 381 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ज्या घरी केअर टेकर म्हणून काम करते तिथून तिने 9 लाख 17 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. डेक्कन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.