Pune News : कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांतर्गत खरेदीबाबत काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांतर्गत महापालिकेचे 500 ऑक्सिजन बेड वाढविणे, लसीकरण मोहीम राबविणे व रेमडेसिवीर व तत्सम इंजेक्शन खरेदीबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली 

कोरोना या संसर्गजन्य रोगाने जगभरात थैमान घातले असून आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाची आत्ता असलेली लाट पाहता भविष्यात पुन्हा कोरोनाची जोरदार लाट आल्यास त्यासाठी उपाय योजना वेळीच आखणे गरजेचे आहे.

पुणे शहरात कोरोना रूग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसून महापालिकेचे 500 ऑक्सिजन बेड वाढविणे गरजेच आहे. महापालिकेचे ऑक्जिसन बेड वाढविल्यास गरीब रूग्णांना त्याचा फायदा होणार आहे. खाजगी रूग्णालयातील ऑक्सिजन बेडचा खर्च गोरगरीब व सामान्य रूग्णांना परवडत नाही.

श्रीमंत रुग्ण घरात देखील ऑक्सिजन विषयक उपचार घेवू शकतात, परंतू गरीब रुग्णांचे हाल होत असल्याने शासकीय व मनपाचे ऑक्सिजन बेड वाढविणे अत्यावश्यक झालेले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावावर नियंत्रण आणणेसाठी लसीकरण हा एकमेव मार्ग सध्या दिसत आहे. सबब पुणे शहरातील सर्वांचे लसीकरण करणे अत्यावश्यक झालेले आहे. ज्या नागरिकांचा लसीचा पहिला डोस झालेला आहे, त्यांना लसीचा दुसरा डोस उपलब्ध होत नाही त्यांना प्राधान्याने दुसरा डोस देणे गरजेचे आहे.

महापालिकेच्या रूग्णालयांतील रूग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने त्यांच्या नातेवाईकांचे होणारे हाल थांबविण्यासठी रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी करण्यात यावी.

पुणे शहरात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने भविष्याचा वेध घेत पुणे शहर ऑक्सिजनसाठी इतर राज्य व शहरांवर अवलंबून राहावे लागणार नाही, यादृष्टीने 5 ऑक्सिजन प्लांट निर्मिती करण्यात यावी अशी मागणी आयुक्त, पुणे महानगरपालिका अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, अरविंद शिंदे, अविनाश बागवे, अजित दरेकर, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, मेहबूब नदाफ यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.