Pune News : ‘ई-पास’साठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक ; 5000 अर्ज बाद

एमपीसी न्यूज – राज्यात अत्यावश्यक कामानिमित्त प्रवासासाठी ‘ई-पास’ पुन्हा सुरू करण्यात आला आहे. ‘ई-पास’साठी सर्वांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं बंधनकारक करण्यात आला असून, अर्जासोबत रिपोर्ट जोडला नसेल तर अर्ज बाद केला जात आहे.

अपवादात्मक परिस्थितीत जेव्हा जवळच्या कुणीचेतरी निधन झाले असेल अशाच परिस्थितीत फक्त कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट नसेल तरी प्रवासाला परवानगी दिली जाईल. पुणे पोलीस आयुक्तालयात डिजिटल पास रुम तयार करण्यात आली आहे. याठिकाणी आतापर्यंत 11 हजार 238 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 3 हजार 302 अर्ज मंजूर करण्यात आले तर, 338 अर्ज मुदतबाह्य झाले. अडीच हजार अर्ज प्रतिक्षेत आहेत तर, तब्बल 5 हजार 97 अर्ज बाद झाले आहेत.

अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या नागरिकांना शहरात प्रवास करण्यासाठी ‘ई-पास’ची आवश्यकता नाही. त्यांनी स्वतःचे ओळखपत्र जवळ ठेवावे. महत्त्वाच्या कारणासाठी जिल्ह्याबाहेर प्रवास करणाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन जमा करून प्रवासासाठी ‘ई-पास’ काढावा लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.