Chakan Crime News : कंपनीच्या आवारातून आठ लाखांचे साहित्य चोरले

एमपीसी न्यूज – कंपनीच्या आवारात ठेवलेले आठ लाखांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 14 एप्रिल रोजी सावरदरी येथील पेस्ट्रा इंजीनियरिंग एलएल पीओपी कंपनीत घडली.

शंकर नामदेव काळभोर (वय 61, रा. निगडी -प्राधिकरण) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरदरी एमआयडीसीमध्ये फिर्यादी यांची पेस्ट्रा इंजीनियरिंग एलएल पीओपी ही कंपनी आहे. त्यांनी कंपनीच्या आवारात साहित्य ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी आठ लाख 1 हजार 212 रुपये किमतीचे कंपनीचे मटेरियल चोरून नेले. हा प्रकार 14 एप्रिल रोजी पहाटे उघडकीस आला. याबाबत 25 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.