Tata Motors Survey : टाटा मोटर्सच्या भागधारकांचा सर्व्हे ; येथे नोंदवा मत

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सने आपल्या भागधारकांची सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून मते मागवली आहेत. यासाठी एक गुगल अर्ज तयार करण्यात आला असून, यावर भागधारकांना टाटांच्या विविध सेवा आणि धोरणांबाबत मत नोंदवता येणार आहे.

टाटा मोटर्स लिमिटेड दरवर्षी आपल्या टिकाऊ कामगिरीबाबत वार्षिक अहवाल तयार करत असते. यासाठी हे सर्व्हेक्षण केलं जात आहे. टाटा मोटर्ससाठी आपण पर्यावरण, सामाजिक आणि शासन / कारभार (ईएसजी) यापैकी काय महत्त्वाचे मानतात, याबाबत भागधारकांना अर्जात माहिती द्यायची आहे.

गुगल अर्ज उघडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://forms.gle/pWX8zi8WVaptWwKYA

अर्ज उघडल्यानंतर आपलं नाव, संस्था आणि ठिकाण यांची माहिती देऊन, पाच प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.