Pune News : हाथरस दलित अत्याचार प्रकरणी योगी आदित्यनाथ सरकार बरखास्त करा; राहुल डंबाळे

रिपब्लिकन युवा मोर्चा व मेहत्तर बाल्मिकी महासंघाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

एमपीसीन्यूज : उत्तर प्रदेश, हाथरस येथे 19  वर्षीय दलित समाजाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची जीभ छाटण्यात आली. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेचे देशभर संतप्त पडसाद उमटत असून या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन युवा मोर्चा व मेहत्तर बाल्मिकी महासंघाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच उत्तर प्रदेशात वाढलेल्या जातीय अत्याचाराच्या घटनांमुळे   योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्याकडे केली आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनामध्ये रिपब्लिकन युवा मोर्चाचे संस्थापक राहुल डंबाळे, प्रदेश अध्यक्षा सुवर्णा डंबाळे, भिमछावा संघटनेचे शामभाऊ गायकवाड, मेहत्तर बाल्मिकी महासंघाचे कविराज संघेलिया, मोहन चव्हाण, विजयकुमार जाधव, चंद्रकांत चव्हाण, किशोर रजपूत, किशोर वाघेला, विनोद निनारिया, मनोज पटेलिया, प्रमोदजी राणा, राजेश बडगुजर, सुरेश झेंड्न्झा, योगेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या आरती जमदाडे, संतोष डंबाळे, स्नेहल कांबळे, अमोल डंबाळे आदींनी सहभाग घेत योगी आदित्यनाथ सरकारचा निषेध नोंदवला.

आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

उत्तर प्रदेश हाथरस येथे  दलित समाजाच्या तरुणीचा सामूहिक बलात्कार करुन तिने याची वाच्यता कोठेही करु नये म्हणून तिची जिभ देखील नराधमांनी छाटली.

उत्तरप्रदेश सरकारने उपचारामध्ये केलेलया दिरंगाईमूळे पीडित युवतीला आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप करत उत्तरप्रदेश सरकार विरोधात देशभर संतापाची लाट उसळलेली आहे.

या पूर्वी देखील उत्तर प्रदेश या ठिकाणी अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या असताना यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याऐवजी या घटनांवर आवाज उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना व पत्रकारांना रासूका सारख्या गंभीर गुन्हयात अटक केली जात आहे.

यामूळे जातिवादी वृत्तीच्या नराधम व्यक्तींचे मनोबल वाढले असून ते राजरोषपणे अत्याचार करत आहेत. अशा घटनांना आळा बसण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करण्याचे आवश्यक असल्याचे राहुल डंबाळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.