Pune News : जिल्हास्तरीय ऑनलाईन युवा महोत्सव 30 डिसेंबरला

एमपीसी न्यूज – जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2021-22 चे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना पुणे आणि पूना कॉलेज ऑफ आर्टस व सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, पिमसे हॉल, कॅम्प येथील पूना कॉलेज येथे 30 डिसेंबर रोजी पार पडेल.

2021-22 या वर्षाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने गुगल मीट या ॲपवर करण्यात येणार आहे. कलाकार आणि स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज क्रीडा अधिकारी श्रीमती शिल्पा चाबुकस्वार 9552931119 व आशद शेख 8484803829 यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावेत, तसेच [email protected] या मेल वर सादर करावेत.

 

स्पर्धक, कलाकारांसाठी वयोगट 15 ते 29 वर्षे असा राहील. वय 12 जानेवारी 2021 रोजी किमान 15 व जास्तीत जास्त 29 वर्षे असावे. नोंदणी करताना प्रवेशिकेसोबत आपले आधार कार्ड व जन्माचा दाखला जोडावा. याकरीता शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.  29 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत व्हॉटसॅप अथवा ई मेल अर्ज येतील अशा स्पर्धकांनाच कला सादर करण्याकरीता व्हॉट्सॲप क्रमांकावर लिंक पाठविण्यात येईल.

 

या युवा महोत्सवामध्ये सांघिक बाबी लोकनृत्य, लोकगीत आदींचा समावेश आहे. प्रवेश अर्ज सादर करताना त्यावर आपला व्हॉट्सॲप क्रमांक नमूद करावा. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, कला अकादमी, संस्था यातील इच्छुक कलावंत, स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.