Pimpri News: भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. भाऊसाहेब देशमुख यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – कृषीक्षेत्रात व्यापक दूरदृष्टी ठेवून देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांनी बळीराजाला समृध्द करण्यासाठी केलेली अमूलाग्र क्रांती कृषीक्षेत्राच्या उज्वल भवितव्यासाठी दिशादिर्शक ठरली असल्याचे प्रतिपादन उपमहापौर हिराबाई घुले यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त उपमहापौर घुले यांच्या हस्ते पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. उपमहापौर घुले म्हणाल्या, डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव योगदान दिले आहे. तंत्रज्ञानातून विकासाचा मार्ग जातो. यावर लक्ष केंद्रीत करुन त्यांनी महाविद्यालयांची तसेच शैक्षणिक संस्थांची स्थापना करुन विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. भाऊसाहेबांनी समाजाच्या उन्नतीकरीता साधन म्हणून शिक्षण महत्वाचे मानले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.