Vaccination News : 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून, आरोग्य कर्मचारी, फ्रन्ट लाईन कर्मचा-यांना मिळणार बूस्टर डोस

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 वोगटातील मुलांचे लसीकरण तसेच, आरोग्य कर्मचारी, फ्रन्ट लाईन कर्मचा-यांना द्यायच्या बूस्टर डोस बाबत नुकतीच घोषणा केली. त्यानंतर केंद्र सरकारने याबाबत सविस्तर गाईडलाईन जारी केली आहे. 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू होणार असून, त्यासाठी कोविन अॅपवरती नोंदणी करवी लागणार आहे.

केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाईन्सनुसार, 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू होणार असून त्यांना केवळ ‘कोव्हॅक्सिन’ ही लस दिली जाईल. आरोग्य कर्मचारी, फ्रन्ट लाईन कर्मचा-यांना द्यायच्या बूस्टर डोस 10 जानेवारी पासून दिला जाईल. त्यासाठी दुस-या डोस मधील अंतर 9 महिने किंवा 39 आठवडे एवढे असावे लागणार आहे. 60 वर्षावरील नागरिकांना देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिसरा डोस घेता येईल. सर्वांनाच मोफत लस दिली जाणार आहे. दरम्यान ज्यांना शक्य आहे त्यांनी खासगी रूग्णालयात सशुल्क लस घ्यावी असे आवाहन देखील सरकराने केले आहे.

बूस्टर डोस किंवा पहिल्यांदा लस घेणा-यांना कोविन अॅपवरती नोंदणी करता येईल तसेच, स्पॉट बुकिंग देखील करता येणार आहे. बूस्टर डोससाठी कर्मचा-यांना पूर्वीच्या कोविन खात्याचा वापर करता येईल. 2007 व त्यापूर्वी जन्म झालेल्या मुले लसीसाठी पात्र आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.