23.3 C
Pune
गुरूवार, ऑगस्ट 11, 2022

Pune News : या कारणामुळे आता पुण्यात शाळेच्या बस मधून मृतदेहाची वाहतूक

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मृतांची ने-आण करण्यासाठी शववाहिका कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयाच्या सहकार्यातून पुणे महापालिकेस 10 स्कूल बस उपलब्ध करूऩ देण्यात आल्या आहेत. स्कूल बसमध्ये आवश्यक ते बदल करून त्या ‘शववाहिका’ म्हणून वापरण्यास येतील. यामुळे मागील वर्षभरापासून बंद असलेल्या स्कूल बसचालकांनादेखील रोजगार उपलब्ध होणार आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्यादेखील वाढत आहे.

त्यामुळे मृतदेह वाहून नेण्यासाठी शववाहिका कमी पडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच सध्या रिकाम्या असलेल्या स्कूल बसेसना शव वाहून नेण्याची परवानगी पुणे आरटीओनं दिली आहे. पुणे महापालिकेनं शव वाहून नेण्यासाठी 10 स्कूल बसेस देण्याची मागणी परिवहन विभागाकडे केली होती. ही मागणी मान्य करण्यात आलीय.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झालीय. मार्च आणि एप्रिल महिन्यात तर प्रचंड वेगाने कोरोना रुग्णांची आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढलीय. आता तर हे प्रमाण इतकं वाढू लागलंय की पालिकेकडं असणाऱ्या शववाहिका शव वाहून नेण्यासाठी कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची ही लाट ओसरेपर्यंत इतर वाहनांच्या मदतीने हे काम पूर्ण करण्याची गरज पालिकेला भासत आहे.

spot_img
Latest news
Related news