Pune News : कात्रज चौकात लावलेल्या ‘त्या’ विचित्र फ्लेक्स विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कात्रजचा खून झाला ! असे लिहलेला एक मोठा फ्लेक्स कात्रज चौकात उभारण्यात आला होता, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. हा फ्लेक्स कोणी लावला, त्याचा अर्थ काय अशा चर्चांना त्यानंतर उधाण आले होते. याप्रकरणी आता भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कात्रज चौकाजवळ जुन्या रस्त्यावर मोकळ्या जागेत एक भला मोठा फ्लेक्स अज्ञातांनी लावल्याचा प्रकार मंगळवारी (दि.28) उघडकीस आला. काळ्या आणि लाल रंगात त्यावर “कात्रजचा खून झाला” असे लिहीत चाकू आणि रक्त दाखवले आहे. कात्रजकरांना हा फ्लेक्स दिसून आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. हा फ्लेक्स कोणी लावला आणि त्याचा नेमका संबंध कोणाशी असा प्रश्न निर्माण झाला आहेत.

याप्रकरणी आता भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.