Pune News: मध्य रेल्वेतून प्रथमच बांगला देशात मोटारी रवाना

पुणे रेल्वेच्या चिंचवड स्थानकातील मालधक्क्य़ावरून 75 पिकअप मोटारींची पहिली खेप नुकतीच बांगला देशात रवाना करण्यात आली.

एमपीसी न्यूज- लॉकडाऊन काळात पुण्यातून पहिल्यांदाच केरळमध्ये मोटारींची वाहतूक करण्यात आली आहे. त्याही पुढे जात मध्य रेल्वेने प्रथमच थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहतूक सुरू केली आहे. पुण्यातून थेट बांगला देशात मोटारी पाठवण्यात आल्या आहेत. वाजवी दर, जलद आणि सुरक्षितता या मुद्दय़ांवर वाहन क्षेत्र आणि वाहतूक महामंडळाकडूनही रेल्वेच्या वाहतुकीला प्रतिसाद मिळतो आहे.

_MPC_DIR_MPU_II

लॉकडाऊनमध्ये देशाच्या विविध भागांत जीवनावश्यक वस्तू, औषधे आदी गोष्टी पाठवण्यात आल्या. पुण्यातून केरळमध्ये मोटारींची वाहतूक करण्यात आली होती. त्यापूर्वी उत्तरेकडील भागात काही प्रमाणात मोटारींची वाहतूक करण्यात आली होती.

पुणे रेल्वेच्या चिंचवड स्थानकातील मालधक्क्य़ावरून 75 पिकअप मोटारींची पहिली खेप नुकतीच बांगला देशात रवाना करण्यात आली. पुण्यातून 2139 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेनापोल येथे या मोटारी पाठविण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.