Pune News : लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ करा – आम आदमी पार्टीची मागणी

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन काळात नागरिकांना भरमसाठी वीजबीले आली आहेत. याच काळात जनतेने नोकर्‍या गमावल्या आहेत. कामगारांना हाताला काम नाही, व्यवसाय नाही आणि बहुतेक जनतेची मोठी आर्थिक कोंडी होत आहे.

या सगळ्या परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही आपणास लॉकडाऊन कालावधी दरम्यानचे वीज बिल माफ करण्याची आणि वाढीव बिले दुरुस्त करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली.

आज भवानी पेठ, गंजपेठ भागातील स्थानिक नागरिकांसह आम आदमी पार्टीने आंदोलन करण्यात आले. आर्थिक विवंचनेमुळे कुणी जीवाचे बरे वाईट करून घेतल्यास महावितरण जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. सद्यस्थितीत कुणाचीही वीज कापू नये, अशी विनंती निवेदनात करण्यात आली.

याप्रसंगी सय्यद एम. अली, मनोज थोरात, डॉ. अभिजित मोरे, मुकुंद किर्दत, संजय रणधीर, हमीद शेख, विक्रम गायकवाड, अरुण गायकवाड, मुस्तक बंगी, इरफान शेख, विनोद शेलार, संदेश दिवेकर, आनंद अंकुश, अजगर बेग, किरण आणि ऋषिकेश मारणे व इतर स्थानिक महिला सामील झाल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.