Pune News: मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश

एमपीसी न्यूज: पुणे शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्तेची आगामी गणिते लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर सुरू केले आहे. सर्वाधिक इनकमिंग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुरू असून आज मनसेच्या माजी नगरसेविका सौ. जयश्री गजानन मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष या नात्याने  प्रशांत जगताप यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर  दीपकभाऊ मानकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक बंडूभाऊ केमसे, नगरसेवक  सुभाष जगताप,  रुपालीताई ठोंबरे व अभय मांढरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार व आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या विचारांवर निष्ठा दाखवून जायश्रीताई राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात दाखल झाल्या आहेत. येत्या काळात शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील.” असे सूचक विधान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.