Pune News: पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प 7 मार्चला

एमपीसी न्यूज: पुणे महापालिकेच्या आयुक्तांना 7 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करण्यास मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

रासने म्हणाले, महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार आयुक्तांनी दरवर्षी १५ जानेवारी पूर्वी अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक असते. परंतु आयुक्तांनी २२ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याची परवानगी स्थायी समितीला मागितली होती. स्थायी समितीने ही परवानगी दिली होती. आज आयुक्त कार्यालयाने काही अपरिहार्य कारणाने अर्थसंकल्पाचा आराखडा २२ फेब्रुवारी ऐवजी ७ मार्च रोजी सादर करण्यास स्थायी समितीने मान्यता द्यावी असा प्रस्ताव ठेवला होता. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.