Pune crime News : ज्वेलर्सवर दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक; बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

एमपीसीन्यूज : ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून कोयते, मिरचीपूड, शस्त्रे जप्त करण्यात आली. ही कारवाई काल मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास साधू वासवानी चौक परिसरात करण्यात आली.

सूरज रवींद्र बोरूडे (वय २१), सोनू राजेश साळुंके (वय २०), गणेश बबन ठोंबरे (वय २३), बळीराम सुदाम पतंगे (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई गौरव उभे यांनी फिर्याद दिली आहे.

बंडगार्डन पोलीस काल मध्यरात्री हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी साधू वासवानी चौकातील गोल्डमार्ट ज्वेलर्स दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्यांची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाउन पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कोयते, मिरचीपूड, शस्त्रे मिळून आली. ज्वेलर्सवर दरोडा टाकणार असल्याची कबुली आरोपींनी दिली.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हरीष ठाकूर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.