Talegaon : पुणे-मुंबई महामार्गावर ट्रकमधून लोंखडी सळया चोरणारी टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई महामार्गावर ट्रकमधून लोखंडी सळया चोरणारी टोळी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पकडली. (Talegaon) ही कारवाई लिंब फाटा तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली. पकडलेल्या टोळीकडून एकूण 18 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

निजाम नवाब खान (वय 58, रा. तळेगाव दाभाडे,पुणे. मूळ रा. बैंगणवाडी, गंवडी, मुंबई), शत्रुघ्न महाबल ठाकूर (वय 60, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, पुणे. मूळ रा. पुराबजार, ता. सदर, जि. आयोध्या, उत्तरप्रदेश), इसराल अहमद आबेदअली शेख (वय 32, रा. तळेगाव दाभाडे, पुणे. मूळ रा. बैराहपुर, ता. फतेपुर, उत्तरप्रदेश), महंमद आरीफखान (वय 40, रा. धारावी, मुंबई. मूळ रा . कुरही, ता. बबेरु, जि. बांधा, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Vadgaon Maval : भोंगळ कारभाराबद्दल माजी मंत्री बाळा भेगडे यांनी धारेवर धरलेल्या तहसीलदारांची गडचिरोली येथे बदली

 

पोलीस उपायुक्त स्वप्न गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना माहिती मिळाली की, जुना पुणे मुंबई महामार्गावर लिंबफाटा तळेगाव दाभाडे येथे काहीजण ट्रक मधून लोखंडी सळया चोरी करीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून पाहणी करत चौघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले चौघेजण ट्रक मधून लोखंडी सळया चोरी करीत होते. (Talegaon) त्यांच्याकडून तीन लाख 78 हजार 600 रुपये किमतीचे सहा हजार 310 किलो वजनाचे लोखंडी सळईचे बंडल आणि 15 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 18 लाख 78 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहायक फौजदार अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार किरण काटकर, प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, प्रदीप गायकवाड यांच्या पथकाने केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.