Pune News : दिवाळीला गावी जाणाऱ्यांसाठी खुशखबर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधून 532 जादा बसेस

एमपीसी न्यूज – दिवाळीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून गावी जाणाऱ्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. पुण्यातील शिवाजीनगर वाकडेवाडी, स्वारगेट आणि पिंपरी-चिंचवडमधून 10 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत 532 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

यातील शिवाजीनगर बस स्थानकातून 241, स्वारगेट बसस्थानकातून 176 आणि पिंपरी-चिंचवड येथून 115 बसेस 10 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सोडण्यात येणार आहेत. या जादा बसेसमधून प्रवास करण्यासाठी आगाऊ आरक्षण करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वेबसाईटवरून अथवा मोबाईलवरूनही तिकीट बुकिंग करता येणार आहे.

या जादा बसेससाठी कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. पूर्वीच्या तिकीट दराने प्रवाशांना या बसमधून प्रवास करता येईल. त्यामुळे प्रवाशांनी अवाजवी दर देऊन खाजगी बसने प्रवास करण्याचे टाळावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.