Maharashtra: तालुकास्तरावर हिमोफिलिया उपचार केंद्र उभारली जावीत, आमदार उमा खापरे यांची राज्य सरकारकडे मागणी

एमपीसी न्यूज – हिमोफिलिया हा अत्यंत दुर्धर आजार आहे. या आजारपणानात (Maharashtra)वेदना व प्रसंगी अपंगत्व देखील येवू शकते. याचे रुग्ण संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. मात्र उपचाराच्या सुविधा केवळ मुंबई पुण्यात आहेत. हेच उपचार केंद्र तालुकास्तरावर निर्माण केले तर या रुग्णांना दिलासा मिळेल, अशी लक्षवेधी आमदार उमा खापरे यांनी विधानपरिषदेत मांडली होती.

याबाबत उमा खापरे म्हणाल्या की, चिंचवड मधील डॉक्टर सुनील लोहाडे हे (Maharashtra)माझे जवळचे परिचित आहेत. व वेळोवेळी आमची भेट होत असते आणि बऱ्याच वेळा त्यांनी हिमोफिलिया या आजाराबद्दल माहिती दिली.

 

हिमोफिलिया मध्ये पेशंटला वारंवार सांध्यांमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे सांधे निकामी होतात व पेशंटला कायमस्वरूपी चे अपंगत्व येते हे ऐकून मनाला खूप वेदना झाल्या. डॉक्टर सुनील लोहाडे यांच्या सोबत याविषयी वेळोवेळी चर्चा होत होती आणि आपण ही या रुग्णांसाठी काहीतरी करावं अशी मनात भावना निर्माण झाली.

 

 

Pune: सांस्कृतिक महोत्सवामुळे तरुणांना व कलावंताना व्यासपीठ मिळते – उल्हास पवार

डॉक्टर सुनील लोहाडे आणि त्यांची संस्था हिमोफिलिया सोसायटी ऑफ महाराष्ट्र बद्दल बऱ्याच वेळा त्यांनी ही माहिती मला सांगितली होती. याशिवाय पेशंट लोकांच्या अडचणी बऱ्याच वेळा त्यांनी मला सांगितल्या आणि या विषयावर आमची खूप वेळा चर्चा ही झाली होती.एकदा त्यांनी मला एका हिमोफिलिया च्या कार्यक्रमासाठी त्यांनी मला मुख्य अतिथी म्हणून बोलवले होते. तो कार्यक्रम डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये झाला होता.

 

या कार्यक्रमासाठी जवळपास 150 ते 200 लोकं वेगळ्यावेगळ्या ठिकाणावरून आले होते. त्यावेळी माझी पेशंट व त्यांचे पालक यांच्याशी बऱ्याच विषयावर चर्चा झाली होती. काही पेशंट तर लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या दूरच्या ठिकाणांवरून आले होते. त्यावेळी मला अजूनही अशी माहिती मिळाली महाराष्ट्रात अंदाजे साडेचार ते पाच हजार रुग्ण आहेत, आणि खूप ठिकाणी याच्या सुविधा उपलब्ध नाहीत. या आजारासाठी लागणारे इंजेक्शन हे खूप महाग असून

त्याची फारशी उपलब्धता नाही. जवळपास 90% पेशंटला हे विकत घेणे शक्य नसते त्यामुळे सरकार मार्फत या इंजेक्शन मदत झाली तर या रुग्णामध्ये येणारे अपंगत्व टाळता येईल, असं मला वाटले. व माझी या हिमोफिलिया रुग्णासाठी काम करण्याची इच्छा निर्माण झाली.

 

सर्व हिमोफिलिया रुग्णाची आर्थिक परिस्थिती वाईट असल्याचे जाणवले. व सर्व हिमाफिलिया रुग्णाला हिमोफिलियाच्या उपचारासाठी दर पंधरा दिवसाला पुण्यात यावा लागत असेल, तर आर्थिक परिस्थिती बिकट असताना. बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या दूरच्या ठिकाणाहून रुग्णाला येणे एक खूप मोठी अडचण होती.

अश्या परिस्थिती मध्ये मला असं वाटायला लागले की, आपण या रुग्णासाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करून या लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी महाराष्ट्र विधानपरिषद मध्ये लक्षवेधी ठरावाच्या वेळी हा प्रश्न उपस्थित केला. व या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी मी सर्व तालुका स्तरावर उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी सरकारकडे मागणी केली.

 

आता महाराष्ट्रात नुकतीच 27 ठिकाणी सरकारी रुग्णालयात “डे केयर” ची सुविधा उपलब्ध झाली आहे, हे “डे केयर” नुकतीच सुरुवात झाली असल्याने त्याच्या मध्ये अजून बऱ्याच सुधारणा वेळोवेळी करण्यात येतील.

सध्या महाराष्ट्रात जीवनावश्यक औषधांचा तुटवडा आहे परंतु वेळोवेळी यामध्ये लक्ष घालून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ही आश्वासन त्यां

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.