Pune: सांस्कृतिक महोत्सवामुळे तरुणांना व कलावंताना व्यासपीठ मिळते – उल्हास पवार

एमपीसी न्यूज – सांस्कृतिक महोत्सवामुळे तरुणांना व कलावंताना(Pune) व्यासपीठ मिळते, त्यांना प्रोत्साहन मिळते. भरत मित्र मंडळाने त्यांना चांगले व्यासपीठ मिळवून दिले आहे. दाभेकर यांनी समाजपयोगी कार्य करत कृतज्ञतेचि भावना जपली आहे, असे माजी आमदार उल्हास पवार म्हणाले. 
भरत मित्र मंडळ व महाशिवरात्र उत्सव मंडळाने महाशिवरात्री निमित्त(Pune) नारायण पेठेत मोदी गणपती जवळ आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी गणेश वंदना, शिवस्तुती, श्रीरामाची प्रार्थना नृत्यविष्काराने सादर करत मुला मुलींनी रसिकांची मने जिंकली.
या महोत्सवाचे हे 45  वर्ष होय. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे अध्यक्ष दीपक मानकर, बाळासाहेब दाभेकर, निरंजन दाभेकर, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक ॲड. मंदार जोशी, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, सामाजिक कार्यकर्ते अंजनेय साठे,  सुजाता चिंता, तेजस्विनी दाभेकर उपस्थित होते.
दीपक मानकर म्हणाले, दाभेकर यांनी या महोत्सवाद्वारे महाराष्ट्रच्या संस्कृतीची सांस्कृतिक वारसा जतन केला आहे.
या महोत्सवत कल्चर्स ऑफ इंडिया, स्वामिनी वाडकर, रत्नाकर शेळके, जतीन पांडे यांच्या डान्स ग्रुपच्या मुलामुलींनी सादर केलेल्या नृत्यविष्काराने नागरिकांना आनंद मिळवून दिला.
प्रसिद्ध क्लावंत संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.  सामाजिक कार्यकर्ते अनिल येनपुरे यांनी उपस्थिताचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.