Pune : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे गुरुवारी आयोजन

एमपीसी न्यूज – उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित (Pune) करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरीता उद्योग विभागाचे विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदशनाखाली व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर, पुणे येथे गुरुवारी (दि. 7 मार्च) सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्रातर्फे देण्यात आली आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2024 ची पूर्व तयारी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेअंतर्गत पुणे जिल्ह्यात लहान उद्योजकांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत तसेच बाजूच्या राज्यांतील उद्योजकांनीही गुंतवणूक करण्याकरिता पुढाकार घेतला आहे. परिषदेमध्ये एकूण 70 प्रस्तावित उद्योगातून 15 हजार 922 कोटी 80 लक्ष रुपये एवढ्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात येणार असून त्यामध्ये जिल्ह्यात भविष्यात 28 हजार 910 नवीन रोजगाराची निर्मिती होणार आहे.

या (Pune) परिषदेला जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम तसेच मोठे उद्योजक यांना निमंत्रित करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व उद्योग घटकांनी या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.