Pune News : इंसेक्टिसाईडचे कांदा पिकासाठी तणनाशक सादर

एमपीसी न्यूज – कांद्याची पेरणी आणि पुर्नलागवडीची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गरजांच्या अनुषंगाने, अग्रगण्य कृषी कंपनी इंसेक्टिसाईड (इंडिया) लिमिटेडने कांदा पिकासाठी ऑक्सिम तणनाशक बाजारात सादर केले आहे. ऑक्सिमची विक्री कंपनीच्या लोकप्रिय ‘ट्रॅक्टर ब्रँड’ अंतर्गत केली जाईल. हे तणनाशक संकुचित आणि रुंद पानांच्या तणांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवेल.

कांद्याच्या पिकाची पेरणी किंवा पुर्नलावणीनंतर 15-20 दिवसांनी किंवा तणांच्या 2-3 पानांच्या अवस्थेत ऑक्सिम सर्वात प्रभावी आहे. विशेषतः ज्या भागात कांद्याची थेट पेरणी केली जाते त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. येथे हाताने खुरपणी करणे खूप कठीण आणि महाग आहे, म्हणून ऑक्सिम या क्षेत्रांसाठी एक चांगला उपाय ठरेल. या वर्षी जुलैमध्ये दुसरे तणनाशक हचिमन लाँच केल्यानंतर ऑक्सिम बाजारात सादर करण्यात आले आहे.

इंसेक्टिसाईड (इंडिया) लि. चे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र अग्रवाल म्हणाले की, “भारत कांद्याच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. त्यातील 70 टक्के रब्बी हंगामात वाढतो. तण हे विविध इनपुट खर्च वाढवतात आणि उत्पन्न कमी करू शकतात. पिकांचे उत्पादन सुधारण्यासाठी आणि कांद्याचा बाजारात स्थिर प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी तण व्यवस्थापन आवश्यक आहे. नवीन तणनाशक कांदा शेतकऱ्यांसाठी निश्चितच मदतगार ठरणार आहे. ऑक्सिम महाराष्ट्र, कर्नाटक, एमपी, गुजरात, बिहार आणि राजस्थानच्या कांदा उत्पादकांना मदत करेल.“

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.