Pune News : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा

एमपीसी न्यूज – “अष्टपैलू कामगिरी करत समाजाच्या, राष्ट्राच्या (Pune News) जडणघडणीत योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये महिनाभर विविध उपक्रमांच्या आयोजनातून महिला दिवस साजरा करणार आहोत,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांनी केले.

 

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या बावधन कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुषमा चोरडिया बोलत होत्या. यानिमित्ताने महिलाकेंद्रीत उपक्रम आयोजिले होते. ‘सूर्या लेडीज’ ग्रुपने भारतीय तीनरंगी स्कार्फ घालून राष्ट्रउभारणीची शपथ घेतली. त्यामुळे प्रत्येकीचा उर अभिमानाने भरून आला होता. आगामी काळात होणाऱ्या सर्व उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेणार असल्याचे सर्व उपस्थित महिलांनी आश्वासन दिले.

 

 

Pimple Gurav News : मराठवाडा जनविकास संघातर्फे महिला व वारकऱ्यांना ग्रामगीतेच्या प्रती भेट

 

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महिला दिवसाच्या कार्यक्रमावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, अधिष्ठाता डॉ. प्रतिक्षा वाबळे, फिजियोथेरपीच्या प्राचार्य डॉ. सिमी रेठरेकर, सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या मुख्याध्यापिका शैला ओक, वाणिज्य विभागाच्या प्रमुख शिल्पा संत, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. केतकी बापट, सूर्यदत्त पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका वंदना पांडे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

 

सुषमा चोरडिया म्हणाल्या, “महिला दिवस एकाच दिवशी साजरा करण्याची (Pune News) गोष्ट नाही. विविध क्षेत्रात भरारी घेत महिला यशाचे शिखर गाठत आहेत. त्यांच्या या यशाचा, समाज बांधणीतील त्यांच्या योगदानाचा सन्मान रोज व्हायला हवा. त्याच भावनेतून ‘सूर्यदत्त’मध्ये वर्षभर विशेषकरून महिन्याच्या प्रत्येक आठ तारखेला महिलांचा सन्मान करणारा उपक्रम आयोजिला जाणार आहे.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.