Talegaon Dabhade : सोमाटणे फाटा येथे बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बसच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. (Talegaon Dabhade) ही घटना गुरुवारी (दि.9) सकाळी साडेआठ वाजता सोमाटणे फाटा येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावर घडला. लालमणी जयस्वाल असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी श्यामनाथ हरीगेन जयस्वाल (वय 56 रा. भोसरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेश शहाजी भोसले (वय 32, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश भोसले याने त्याच्या ताब्यातील बस (एमएच 14/एचयु 5372) भरधाव वेगात चालवली. सोमाटणे फाटा येथे फिर्यादी यांचा भाऊ लालमणी (Talegaon Dabhade) रस्ता ओलांडत असताना भोसले याच्या बसने त्यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या लालमणी यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.