Pune crime News : वारजे येथील घरफोडीत सव्वा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी घरातील रोख अठरा हजार रुपये व एक लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. वारजे गावठाण परिसरात 10 ते 11 नोव्हेंबर दरम्यान ही घटना घडली.

याप्रकरणी 70 वर्षीय जेष्ठ नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वारजे गावठाण परिसरात घर आहे. त्यांचे घर कुलूप लावून बंद असताना 10 ते 11 नोव्हेंबर दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील रोख अठरा हजार रुपये व एक लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.

वारजे पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.