Chinchwad News : शिवसेनेच्यावतीने मोहननगर, काळभोरनगरातील सफाई कामगारांना मिठाई वाटप

एमपीसीन्यूज : शिवसेना शाखा मोहननगर-काळभोरनगर तसेच  नगरसेविका मीनल यादव आणि शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव यांच्या वतीने आज, शुक्रवारी परिसरातील सर्व सफाई कामगारांना मिठाई वाटप करुन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.

शिवसेना शाखा मोहननगर येथे दुपारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगरसेविका मीनल यादव, विभागप्रमुख विशाल यादव, नाना काळभोर, ज्येष्ठ नेते विजयकुमार गुप्ता, उपविभागप्रमुख सोमनाथ अलंकार, प्रवीण शिंदे, प्रशांत जाधव, शाखाप्रमुख नागेश नामदे, संतोष धावडे, रघुनाथ कदम, उपविभागप्रमुख सोमनाथ अलंकार, मनोज मोहिते, रोहित खजिनदार, स्वप्नील येवले, मधुसुदन अबुसष्कर, बाबू नामदे, सतीश चौधरी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

नगरसेविका मीनल यादव आणि विभागप्रमुख विशाल यादव यांच्यावतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त परिसरातील सफाई कामगारांना मिठाईचे वाटप केले जाते. यंदाही सुमारे 90 सफाई कामगारांना मिठाई वाटप करण्यात आली. तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

नगरसेविका मीनल यादव म्हणाल्या, कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने सोशल डिस्टंसिंग पाळावे, मास्क शिवाय घराबाहेर पडू नये. कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनावर अद्यापही लस आलेली नाही. त्यामुळे कुणीही गाफील राहू नये. आगामी वर्षात कोरोनामुक्त वातावरण पाहायला मिळो, अशा शुभेच्छाही त्यांनी उपस्थितांना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.