Pune News : गणेश कला क्रीडा येथील पालिकेचे 120 ऑक्सिजन बेडचे कोरोना केअर सेंटर सुरु

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेचे 120 ऑक्सिजन बेडचे गणेश कला क्रीडा स्वारगेट येथील कोरोना केअर सेंटर उद्घाटनाचा घाट न घालता कोरोना रुग्णांना दाखल करून घेऊन सुरू करण्यात आले.

13 एप्रिल रोजी गुडी पाडव्याच्या दिवशी असा प्रकल्प पुणे महानगरपालिकेचा सुरु व्हावा ही कल्पना महापालिका आयुक्तांशी चर्चा केली व प्रयत्न सुरू झाले. आणि अखेरीस दोन आठवड्यानंतर सुसज्ज 120 ऑक्सिजन बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू झाले.

यामध्ये जवळ जवळ 120 ऑक्सिजन बेड,10 व्हेंटिलेटर बेड, आयसीयू याबरोबरच 15 डॉक्टर्स, 60 नर्सेस व स्टाफ असून सर्व कोरोना रुग्णांना येथे मोफत उपचार केले जातील. त्यांना चहा,नाष्टा व जेवण मोफत दिले जाईल. तसेच या सेंटरसाठी अतिरिक्त दोन टन ऑक्सिजनची देण्याची मान्यता घेण्यात आली आहे. व ऑक्सिजनचे 10 ड्युरो देखील उपलब्ध करण्यात आले आहे.

120 ऑक्सिजन बेडचे हे कोरोना केअर सेंटर गणेश कला क्रीडा येथे सुरू करण्याची संकल्पना मांडून त्याचा पाठपुरावा करणारे पुणे महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी सांगितले की, 15 दिवसाच्या अथक प्रयत्नांतून 120 ऑक्सिजन बेडचे कोरोना सेंटर सुरू होत आहे. ही पुणेकरांच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. सध्या पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये अंदाजे 11000 कोरोना रुग्ण असून पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालय, जम्बो कोविड सेंटर व इतर सेंटर मध्ये सुमारे 1500 ते 1600 रुग्ण आहेत व ससून हॉस्पिटलमध्ये 600 रुग्ण आहेत.

पुण्यातील आर्थिकदुर्बल घटकातील नागरिकांना ज्यांना खासगी हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही. त्यांच्यासाठी महानगरपालिकेने शहरात जसे कोविड सेंटर सुरू केले आहेत त्या प्रमाणेच गणेश कला क्रीडा स्वारगेट येथेही कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. सद्याच्या ऑक्सिजन कमतरतेमुळे हे सेंटर सुरू करण्यास विलंब झाला मात्र जिद्धीने दोन टन ऑक्सिजन पुरवठा करण्यास आम्ही यशस्वी झालो असून हे सुसज्ज 120 ऑक्सिजन बेड कोरोना सेंटर गरीब पुणेकरांच्या सेवेला सज्ज झाले असून कोरोना रुग्ण येथे मोफत उपचार घेऊ शकतील असे आबा बागुल यांनी सांगितले.

आबा बागुल म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या या महत्वकांक्षी प्रकल्पात काही सामाजिक ट्रस्टने देखील सहकार्य केले असून अनेक दानशूर व्यक्तींनी मदत करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. याचे मी स्वागत करतो. हे केंद्र उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देईनच शिवाय गरीब कोरोना रुग्णांना येथे नक्कीच दिलासा मिळेल असा मला विश्वास आहे. या 120 ऑक्सिजन बेड कोरोना सेंटर मुळे पुणेकरांची सोय झाली ही चांगली बाब आहे. मात्र पुण्यातील सारे कोरोना रुग्ण बरे होऊन हे 120 ऑक्सिजन बेड कोरोना केअर सेंटर जेंव्हा रिकामे होईल. तो माझ्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. अश्या भावना आबा बागुल यांनी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.