Pune News : पुण्यात महविकास आघाडीचा एल्गार, अलका चौकात निर्धार सभा

एमपीसी  न्यूज –  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात उद्या (शनिवारी) महविकास आघाडीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात सद्भावना निर्धार सभेच आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात 30 एप्रिल रोजी  सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार असून या सभेत केंद्र सरकारच्या विरोधात काही ठराव मांडणार येणार असल्याचं महविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेत जाहीर केलं आहे.
या सभेला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षासह डाव्या व पुरोगामी पक्ष संघटना देखील उपस्थित राहणार आहेत. देशांमध्ये राज्यांची आर्थिक आणि राजकीय कोंडी करणारे निर्णय केंद्रामधील मोदी सरकार घेत आहे. त्यामुळे आपल्या राज्यघटनेलाच सुरुंग लागत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

 

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असून या महगाई विरोधात काम करण्याचं सोडून यावरून जनतेच लक्ष वळवण्यासाठी धर्माचा वापर करत लोकांचं लक्ष वळविले जात आहे, असा आरोप करत केंद्र सरकारच्या याच धोरणांच्या विरोधात महविकास आघाडीने या सभेचं आयोजन केलं आहे. इंथन दर, महागाई, राज्यात वाढणाऱ्या धर्मांध सत्तेच्या विरोधात ही सभा होणार असल्याची माहिती देखील नेत्यांकडून देण्यात आली आहे.

 

राज्यातले आणि देशातले अनेक पक्षाचे नेते या सभेला उपस्थित राहणार असून मात्र अद्यापही  या नेत्यांची नावे गुलदस्त्यात आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.