Pune News : ‘शेर शिवराज’ चित्रपटाला प्राईम टाईम देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – कोरोनानंतर बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांनी धुमाकूळ घातलेला असताना मराठी चित्रपटांना देखील सोनेरी दिवस आलेले आहेत,  अशातच दिगपाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ ह्या चित्रपटाला सर्वांनी  डोक्यावर उचलून धरले आहे. परंतु दाक्षिणात्य सिनेमा केजीएफ 2 मुळे ‘शेर शिवराज’ या चित्रपटाला प्राईम टाईममध्ये स्र्किन मिळत नसल्याने शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

दाक्षिणात्य सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असून त्यांच्या सिनेमासाठी महाराष्ट्रात थिएटर्समध्ये जादाच्या स्क्रिन मिळत असून मराठी चित्रपटांना दुय्य्म स्थानी स्क्रिन मिळत आहेत, शेर शिवराज हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा असून लहानांपासून वयोवृधांना देखील चित्रपटाने भुरळ घातलेली आहे.

परंतु चित्रपट प्राईम टाईमवर दाखवला जात नसल्याने सह्याद्री प्रतिष्ठान व अनेक शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे ह्या चित्रपटाला जास्तीच्या स्क्रिन मिळाव्यात नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे आवाहन थिएटर्स मालकांविरोधात संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

भविष्यात मराठी सिनेमे 100 करोडोंच्या घरात नक्कीच जातील, असे विधान अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी केले होते. परंतु प्राईम टाईमवर स्क्रिन मिळत नसल्याने मराठी चित्रपट 100 करोडोंच्या क्लबमध्ये जातील का? असा प्रश्न आता सिनेरसिकांच्या मनात उदभवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.