Pune Temperature : राज्यात उष्णतेची लाट कायमच; पुण्याचा पारा 41.8

एमपीसी न्यूज – राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. आजही राज्यातील अनेक शहरातील पारा 40 अंशांच्या पुढे गेल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले.पुण्यात आज कालच्या पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. काल शहरात 41.3 अंश तापमान नोंदविले गेले तर आज 41.8 अंश इतकी नोंद झाली आहे.

उकाड्याने दिवसभर नागरीकांची काहिली झाली होती. तसेच बाहेर जाताना नागरीक टोपी, छत्री यांचा वापर करीत होते. त्याशिवाय ताक, लस्सी, उसाचा रस, नीरा या थंड पेयांच्या दुकानातही नागरिक गर्दी करताना दिसत होते. त्याशिवाय फऴांच्या गाड्यांवरही नागरिक गर्दी करत होते.

कामानिमित्त घराबाहेर ज्यांना जावे लागत होते त्यांनी टोपीबरोबर रुमालही डोक्याला गुंडाळलेला दिसत होते. घरात आणि कार्यालयात पंखे आणि एसी मोठ्या प्रमाणात चालू होते.

पुणे शहर, पिंपरी चिंचवडमध्येही अनेक जण उन्हापासून वाचण्यासाठी आडोश्याची जागा शोधताना दिसत होते. महिलांनी उन्हापासून बचावासाठी सनकोट आणि हात मोज्यांचा वापर केलेला दिसत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.