Pune News: मराठी भाषा संवर्धन सप्ताहाच्या निमित्ताने पंडित नेहरू विद्यालय, कामशेत येथे ग्रंथदिंडीचे आयोजन

एमपीसी न्यूज:  आज शनिवार दिनांक २६/०२/२०२२ रोजी “मराठी भाषा संवर्धन सप्ताहाच्या निमित्ताने” पंडित नेहरू विद्यालयात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. ग्रंथदिंडीच्या पालखीचे प्राचार्य आजिनाथ ओगले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या प्रसंगी उपप्राचार्य उमेश सोनवणे, पर्यवेक्षिका जयश्री साबळे मराठी विषयाचे सर्व अध्यापक उपस्थित होते.

पारंपारिक वेशभूषेत असणाऱ्या विद्यार्थिनींनी डोक्यावर मराठी साहित्यातील ऐश्वर्याची वचनाक्षरे, श्री तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, भगवद् गीता,वाल्मिकी रामायण, महाभारत व नाट्य कोष इत्यादी मराठी ग्रंथ संपदा टाळमृदुंगाच्या गजरात अभंग, ओव्या गात व मराठी भाषा संवर्धनासाठी घोषणांच्या निनादात ग्रंथ दिंडी विद्यालय ते मराठी शाळा, आरोग्य केंद्रापासून, शिवाजी चौक, कामशेत बाजारपेठ मार्गे पुन्हा विद्यालयात येऊन पालखी भोवती गोल रिंगण करून विद्यार्थीनी व अध्यापिकांनी फेर धरून व फुगड्या खेळून दिंडीची सांगता केली.

विद्यालयातील मराठी विषयाचे सर्व अध्यापक व ग्रंथालय प्रमुख प्रविण कांबळे यांच्या सहकार्याने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले.
या ग्रंथ दिंडी मध्ये इयत्ता आठवी, नववी चे सर्व विद्यार्थी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद सहभागी झाले होते.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.