Chinchwad News: दवाखान्यातून कामावरून कमी केलेल्या महिलेनं मेडिकलमधील चेक बुक पळविले, 58,500 रुपयांचा अपहार 

एमपीसी न्यूज – दवाखान्यातून कामावरून कमी केलेल्या महिलेनं संलग्न असलेल्या मेडिकल मधून चेक पळविले. चेकबुक वापरून 58 हजार 500 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डिसेंबर 2021 ते 18 फेब्रुवारी 2022 या कालावधीत आरोही मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्स, गुंजकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, शिवतेज नगर चिंचवड येथे ही घटना घडली.  

याप्रकरणी दिगंबर मारोतराव गुंजकर (वय 70, रा. स्पाईन रोड, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला एप्रिल ते जून 2021 दरम्यान गुंजकर हॉस्पिटलमध्ये कामाला होती. जून 2021 मध्ये तिला कामावरून कमी करण्यात आले. तरीही आरोपी महिला वारंवार हॉस्पिटलमध्ये जात होती. हॉस्पिटलला संलग्न असलेल्या आरोही मेडिकल मधून महिलेनं चेकबुकची चोरी केली व 58 हजार 500 रुपयांचा अपहार केला असे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस अधिक तपास करीत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.